In Pics : डोंबिवली गणेश मंदिराच्या आवारात साकारली महारांगोळी
दरवर्षी गुढीपाडवा स्वागत यात्रेच्या निमित्ताने डोंबिवली गणेश मंदिराच्या आवारात संस्कार भारतीच्या वतीने महारांगोळीचे आयोजन केले जाते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसंस्कार भारतीचे कलाकार स्वागत यात्रेचा मार्ग रांगोळ्यानि सजवतात तर गणेश मंदिराच्या आवारात महारांगोळी काढली जाते.
यंदाही त्याच उत्साहाने संस्कार भरतीच्या सदस्यांनी 30 बाय 45 आकाराची महारांगोळी साकारली आहे.
भारताच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून 75 कलाकारांच्या सहकार्याने ही रांगोळी साकारण्यात आली आहे.
250 किलो रंग वापरून हि कलाकृती साकारली गेली आहे. विशेष म्हणजे भारत मातेच्या सभोवती 75 उद्दिष्ट पूर्तीचे गोल रांगोळीच्या माध्यमातून साकारण्यात आले आहेत.
चैत्र प्रतिपदेच्या आदल्या दिवशी आमवस्येला छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान दिनी तरुणाईत छात्र तेज निर्माण करण्यासाठी डोंबिवली गणेश मंदिर संस्थाच्या वतीने ढोल ताशे वाजवून छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले.