In Pics : पुन्हा बैलगाड्यांच्या शर्यतीचा थरार रंगणार, शर्यतीच्या गाड्यांच्या मागणीत मोठी वाढ
सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडी शर्यतीवरील बंदी सशर्त उठवली. त्यानंतर 20 डिसेंबर रोजी राज्य सरकारने अधिकृत शासन निर्णय काढून राज्यातील बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसध्या महाराष्ट्रात शर्यतीच्या बैलजोडींना मागणी वाढली आहे.
शर्यतीच्या बैलजोडी बरोबरच शर्यतीसाठी लागणाऱ्या शर्यतीच्या गाड्यांची देखील मागणी प्रचंड वाढली.
सध्या प्रशासनाच्या सर्व अटीचे पालन करून बैलगाडी शर्यतीचे आयोजन करणे सक्तीचे आहे.
काही ठिकाणी प्रशासनाची परवानगी न घेता शर्यती आयोजित केल्या गेल्या. मात्र नंतर या बैलगाडी शर्यतींच्या आयोजकावर शर्यतीचे आयोजन रद्द करण्याची नामुष्की आली.
असं जरी असलं तरी काही ठिकाणी प्रशासनाची पूर्ण परवानगी घेऊन बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यास सुरुवात झाली आहे.
तसेच शर्यतीचे सराव देखील सुरु झालेत. यामुळे नवीन शर्यतीच्या गाड्याना मागणी प्रचंड वाढली आहे.
सांगलीतील नांद्रे गावातील इंदिरा फॅब्रिकेटर्सचे मालक शरद पाटील मागील कित्येक वर्षापासून या शर्यतीच्या गाड्या बनवतात.
2014 मध्ये बैलगाडी शर्यतीवर बंदी आल्यानंतर त्यांचा हा व्यवसाय कर्नाटक आणि दुसऱ्या राज्यातील मार्केटवर अवलंबून होता.
मात्र महाराष्ट्रामध्ये देखील शर्यतीना परवानगी मिळाल्याने त्याच्याकडे शर्यतीच्या गाड्या बनवण्यासाठीच्या ऑर्डर वाढल्या आहेत.
कोकण, पुणे जिल्हा आणि विदर्भ, मराठवाड्यातील शर्यती प्रेमी याच भागातील शर्यतीचे गाडी पसंत करतात.
सात हजार पासून ते नऊ हजार पर्यंत या शर्यतीच्या गाड्या विकल्या जाता