Photo : महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढला
राज्यात तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. थंडीत दिवसेंदिवस वाढ होतोना दिसत आहे. तसेच काही ठिकाणी धुके पडत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appथंडी वाढल्यानं ठिकठिकणी शेकोट्या पेटल्या आहेत. वाढत्या थंडीचा मानवी जीवनावर परिणाम होत असल्याचे चित्र दिसत आहे.
अनेक ठिकाणी धुके पडले आहे. त्यामुळं वाहन चालवताना अडचणी निर्माण होत आहेत.
image 4
निफाडमध्ये 6.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. आज सर्वात कमी तापमानाची नोंद नाशिकमधील निफाडमध्ये झाली.
मुंबईतही तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. मुंबईत 13 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
जळगाव जिल्ह्यामध्येही थंडी वाढली आहे. जिल्ह्यात तापमानाचा पारा 7.8 अंशावर गेला आहे.
पुण्यातही थंडी वाढली आहे. ठिकठिकाणी शेकोट्या पेटलेल्या दिसत आहेत. पुण्यात 10 अंशा सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
मराठवाडा देखील चांगलाच गारठला आहे. औरंगाबादमध्ये 8.8 अंश तापमानाची नोंद झाली आहे. मराठवाड्याचा पारा दिवसेंदिवस घसरताना दिसत आहे.
राज्यात तापमानाचा पारा घसरला आहे. त्यामुळं थंडीत वाढ झाली आहे. याचा परिणाम मानवी जीवनावर होत आहे.