शिंदेंचा चेहरा पडला अन् फडणवीस-दादांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले; अमित शाहांच्या बैठकीत मुख्यमंत्री ठरला
महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण असणार? उपमुख्यमंत्री किती असणार? मंत्रिमंडळ कसं असेल? शपथविधी कधी होणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं लवकरच महाराष्ट्राला मिळणार आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकारण महाराष्ट्रातील लोकांना पडलेल्या या प्रश्नावर नवी दिल्लीत महाबैठक पार पडली. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्याशी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी चर्चा केली.
एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदावरचा दावा सोडल्यानं मुख्यमंत्रिपद भाजपलाच मिळणार हे स्पष्ट झालंय.
मुख्यमंत्रिपद देवेंद्र फडणवीसांनाच मिळणार हे तिथल्या नेत्यांच्या बॉडी लँग्वेजमधून दिसत होतं.
अमित शाहांची भेट घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीसांच्या चेहऱ्यावर हसू होते. अजितदादाही खूश असल्याचं दिसून आलं.
त्याचवेळी बाजूला असलेल्या एकनाथ शिंदे यांचा चेहरा मात्र पडल्याचं दिसून आलं. शिंदेंच्या बॉडी लँग्वेजवरून ते नाराज असल्याचं दिसून आलं.
दिल्लीतील ही बैठक सुरू होण्यापूर्वी दिल्लीत आणखी एक बैठक पार पडली. देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांशी जवळपास दीड तास चर्चा केली. दरम्यान, एकनाथ शिंदे हे दिल्लीत आले आणि त्यांनी थेट अमित शाहांची भेट घेतली.