Temperature Today : चंद्रपूर जगातील सर्वाधिक तापमान असणारे शहर; पाहा जगातील आजची उष्ण शहरं
जगातील सर्वात जास्त तापमानाची नोंद चंद्रपूरमध्ये झाली. त्यानंतर पश्चिम आफ्रिकेतील कोल्डा दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगातील 10 उष्ण शहरात बहुतांशी शहरे भारतातील आहे.
Temperature Today : चंद्रपूर जगातील सर्वाधिक तापमान असणारे शहर; पाहा जगातील आजची उष्ण शहरं
1/10
जगभरात सर्वाधिक तापमानाच्या पहिल्या 15 ठिकाणांमध्ये आठ शहरे भारतातील होती. चंद्रपूर तब्बल 43.2 अंश से. तापमानासह पहिल्या क्रमांकावर होते.
2/10
पश्चिम आफ्रिकेतील सेनेगल देशातील कोल्डा शहर जगातील दुसऱ्या क्रमांकाचे उष्ण शहर ठरले. कोल्डामध्ये आज 43 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
3/10
भारतातील कर्नुलमध्ये जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या तापमानाची नोंद झाली. कर्नुलमध्ये 42.7 अंश सेल्सिअसची नोंद करण्यात आली.
4/10
चौथ्या स्थानावर भारतातील नांदयाल हे शहर असून 42.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.
5/10
पाचव्या स्थानी थायलंड थिओन या शहराचा क्रमांक असून 42.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.
6/10
सहाव्या स्थानी म्यानमार टाँउगो शहराची नोंद करण्यात आली असून 42.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले.
7/10
सातव्या स्थानी आंध्र प्रदेश राज्यातील नंदीगमा शहराचे स्थान असून 42.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले.
8/10
आठव्या स्थानी म्यानमारमधील च्योक शहर असून 42.2 अंश सेल्सिअस इतके तापमान होते.
9/10
विदर्भातील वर्धा नवव्या स्थानी असून आज 42.2 अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदवण्यात आले.
10/10
दहाव्या स्थानी थायलंडमधील मेंग हाँग सन हे शहर असून 42.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
Published at : 13 Apr 2023 09:39 PM (IST)