चंद्रभागेच्या तीरी..उभा मंदिरी! माघी एकादशीनिमित्त पंढरपुरात हजारो वारकऱ्यांची मांदियाळी, चंद्रभागेत स्नानासाठी मोठी गर्दी, पहा Photos
शनिवार, 8 फेब्रुवारी रोजी जया एकादशीचे व्रत आहे. हे व्रत केल्याने भूत, पिशाच्च इत्यादीपासून मुक्ती मिळते. असा समज आहे.
maghi ekadashi
1/9
वारकरी संप्रदायातील महत्त्वाची मानली जाणाऱ्या माघी वारीचा महत्त्वाचा व मुख्य दिवस म्हणजे माघी एकादशी .
2/9
या एकादशीसाठी लाखो भाविक खेडोपाड्यातून गावोगावातून पांडुरंगाच्या दर्शनाला आले आहेत .
3/9
माघी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी चंद्रभागेच्या तीरावर हजारोंच्या संख्येने भाविक पोहोचले आहेत .
4/9
एका मिनिटात अंदाजे 27 च्या आसपास भाविक विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन घेत आहेत .
5/9
पहाटेपासून चंद्रभागेत पवित्र स्नान करण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आहे .
6/9
हरिनामाच्या गजरात भक्तांची मांदियाळी पुन्हा एकदा पंढरपुरात जमली आहे .
7/9
मंदिर परिसर भक्तांनी गजबजून गेला आहे .पंढरपुरात चंद्रभागेत स्नानासाठी तुडुंब गर्दी झाली आहे .
8/9
माघ महिन्यातील या एकादशीचे वारकरी संप्रदायात मोठे महत्त्व आहे .या दिवशी भगवान विष्णूची पूजा करत वारकरी उपवास धरतात .
9/9
चंद्रभागेत स्नान करून दानधर्म करण्याकडे भक्तांचा कल असतो .
Published at : 08 Feb 2025 11:08 AM (IST)