Kolhapur tourism : कोल्हापुरात पर्यटकाची मोठी गर्दी; अंबाबाई मंदिरात पाच दिवसांत 3 लाखांवर भाविकांकडून दर्शन

कोल्हापूर शहरातील अंबाबाई मंदिरासह रंकाळा तलाव, पन्हाळा किल्ला, आंबा घाट, गगन बावडा आदी प्रसिद्ध पर्यटन स्थळांवर राज्य आणि लगतच्या कर्नाटकातील पर्यटकांनी या आठवड्यात कोल्हापूर गजबजले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
कोल्हापूर शहरातील प्रसिद्ध अंबाबाई मंदिर हे पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे, गेल्या पाच दिवसांत अंबाबाई मंदिरात 3,06,207 भाविकांनी भेट दिली आहे.

28 ऑक्टोबर रोजी सर्वाधिक (85,190) भाविकांची नोंद झाली, तर 24 ऑक्टोबरला 70,000 भाविकांनी भेट दिली.
वाडी-रत्नागिरी येथील ज्योतिबा मंदिर आणि नृसिंहवाडीमध्ये भाविकांची मोठी गर्दी होती.
न्यू पॅलेस, खिद्रापूर कोपेश्वर मंदिर, नृसिंहवाडी दत्त मंदिर, कणेरी मठ, ज्योतिबा मंदिर, अंबा, पावनखिंड, विशाळगड किल्ल्यावरही पर्यटकांची मोठी गर्दी दिसून आली.
गर्दी वाढल्याने काही पर्यटकांना राहण्यासाठी खोली मिळणे कठीण झाले होते.
त्यामुळे काही ठिकाणी लगेच भाडे वाढ झाल्याचे दिसून आले
अजून दोन ते तीन दिवस गर्दी राहण्याची शक्यता आहे.
शहरात गर्दी वाढल्याने वाहतूक कोंडीलाही सामोरे जावं लागत आहे.
नवरात्रोत्सवामध्येही अंबाबाई मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती.