Bharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रेत झळकला 'कोल्हापुरी बाणा'; राहुल गांधीही भारावले
भारत जोडो यात्रेत 12 नोव्हेंबर रोजी कोल्हापूर जिल्ह्यातून 10 हजारांवर कार्यकर्ते सहभागी झाले होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयात्रेमध्ये कोल्हापूरचा ऐतिहासिक वारसा असणाऱ्या कुस्तीचा फड रंगला. यावेळी राहुल गांधी कुस्ती कौशल्य जाणून घेतले.
कोल्हापुरी शान असणारा कोल्हापुरी फेटा राहुल यांना घालण्यात आला.
कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांनी कोल्हापुरी फेटे बांधून यात्रेत प्रवेश केल्याने वेगळेपण दिसून आले.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी चर्चा करताना कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील
आमदार सतेज पाटील यांनी भारत जोडो यात्रेसाठी तगडे नियोजन केले होते. राहुल गांधी या नियोजनामुळे भारावून गेले.
कोल्हापूरच्या तरुणी तसेच महिलांचाही यात्रेत मोठा सहभाग दिसून आला.
शिवकालीन प्रात्यक्षिकेही यावेळी सादर करण्यात आली.
कोल्हापूचे आणखी एक आकर्षण असलेल्या लेझीमनेही यात्रेत आणखी रंगत आणली.
आमदार सतेज पाटील राहुल गांधी यांच्याशी चर्चा करताना
लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या वेशात सहभागी झालेले काँग्रेस कार्यकर्ते दिलीप जाधव आणि पैलवानांसोबत राहुल गांधी