PHOTO : आमदार ऋतुराज पाटलांनी मारलं मैदान; कबड्डीच्या मैदानात दाखवलं कसब
कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील कबड्डीच्या मैदानात उतरले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउचगावमधील स्पर्धेदरम्यान ऋतुराज मैदानात उतरत आपलं कसब दाखवलं.
ऋतुराज यांनी टाकलेल्या एन्ट्रीची कोल्हापुरात चर्चा होत आहे.
हा व्हिडीओ देखील जोरदार व्हायरल होत आहे.
पाटील यावेळी म्हणाले की, कबड्डी खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी व स्थानिक खेळाडूंच्या कलागुणांना वाव देण्यासाठी दक्षिण मतदारसंघातील उचगाव येथे 'कबड्डी मॅट' उपलब्ध करून देण्यात आला आहे
नव्या मॅटवर खेळविण्यात येणाऱ्या पहिल्या कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन करून सहभागी खेळाडूंना त्यांनी शुभेच्छा दिल्या.
नव्या मॅटवर खेळविण्यात येणाऱ्या पहिल्या कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन करून सहभागी खेळाडूंना त्यांनी शुभेच्छा दिल्या.
त्यांनी म्हटलं स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंचा उत्साह पाहून मला सुद्धा कबड्डी खेळण्याचा मोह टाळता आला नाही आणि मग मी सुद्धा कबड्डी खेळण्याचा आनंद घेतला.
यावेळी, लहानपणीच्या अनेक आठवणींना उजाळा मिळाला, असंही ते म्हणाले.
उंचगाव गावाने सुद्धा या सर्व क्षेत्रात आपले योगदान दिले आहे. गावाला चांगली क्रीडा परंपरा सुद्धा लाभली असून या कबड्डी स्पर्धेच्या निमित्ताने गावातील खेळाडूंना मॅट वर खेळायला मिळत आहे आणि त्यासाठी आमदार म्हणून योगदान देता आले याचा मला मनस्वी आनंद आहे.