ST Electric Bus : आरामदायी प्रवासाची हमी, देते एसटीची 'शिवाई'; पाहा फोटो
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jun 2022 04:52 PM (IST)
1
राज्याची लाइफलाइन म्हणून ओळख असलेले लाल परी आता नव्या रुपात प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे. एसटी महामंडळाच्या ताफ्यातील पहिली इलेक्ट्रीक बस 'शिवाई' प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे. एसटी महामंडळाच्या स्थापना दिनाच्या दिवशी शिवाई बसचा लोकार्पण सोहळा पार पडला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
शिवाई इलेक्ट्रिक बसची लांबी 12 मीटर आहे. आतील बाजूस 2 आणि बाहेरील बाजूस 1 असे कॅमेरा आहेत.
3
या बससाठी 10 बॅटरी असून एकदा चार्ज केल्यावर 200 ते 250 किलोमीटर धावणार आहे.
4
या बसमधील आसनक्षमता 43 प्रवाशांची आहे.
5
ध्वनी व प्रदुषणविरहीत तसेच वातानुकूलीत बस असणार असून प्रवाशांना गारेगार प्रवासाचा अनुभव घेता येणार आहे.
6
ही बस ताशी 80 किमी वेगाने धावणार आहे.
7
'शिवाई'च्या पुणे –अहमदनगर –पुणे मार्गावर दिवसाला 6 फेऱ्या होणार आहेत.