Kalapurnam Tirth Dham : बिनखांबी रंगमंडप, संगमरवरी वास्तू; नाशिकच्या देवळालीमधील कलापूर्णम तीर्थधाम भाविकांसाठी खुलं
धार्मिक नगरी म्हणून ओळख असलेल्या नाशिकच्या सौंदर्यात आणखी भर पाडणारी एक वास्तू देवळाली कॅम्प परिसरात उभी राहिली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appही वास्तू म्हणजे कलापूर्णम तीर्थधाम आणि देशभरात ही वास्तू चर्चेचा विषय ठरत आहे.
जवळपास दीड एकर जागेत उभारलेल्या कलापूर्णम तीर्थधाममधील 81 बाय 81 चौरस फुटाच्या रंगमंडपात एकही खांब नाही.
देशातील अशाप्रकारचे हे पहिलंच मंदिर (तीर्थधाम) असल्याचा दावा मंदिर संस्थानकडून करण्यात येत आहे.
24 तीर्थकारांच्या या तीर्थधामचे गेल्या सात वर्षांपासून उभारणीचे काम सुरु होते, 150 कारागिरांनी यासाठी मेहनत घेतली.
जैन धर्माचे मूलनायक मुनिसुव्रत स्वामी यांची भव्य मूर्ती गाभाऱ्यात असून उर्वरित 360 अंशांमध्ये 23 तीर्थकारांचे दर्शन ईथे होते.
संपूर्ण वास्तू ही संगमरवरी दगडापासून बनवण्यात आली आहे.
इथल्या प्रत्येक भिंतीवर रेखाटलेले सुंदर आणि वेगवगळे नक्षीकाम येणाऱ्या प्रत्येक भाविकाचे लक्ष वेधून घेते.
दोनच दिवसांपूर्वी हे मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले असून सध्या विविध पूजाविधी सुरु आहेत.
तीन मार्चपर्यंत मंदिराच्या प्रांगणात विविध धार्मिक विधी, कथा, प्रवचन, सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार असल्याची माहिती विश्वस्तांनी दिली.