Kaas Plateau : तब्बल दोन वर्षांनंतर कास पठार पर्यटकांसाठी खुले, निसर्गाची उधळण पाहायला येणार पर्यटक
सह्याद्रीचा कुशीतील कास पठार गेल्या दोन वर्षापासून लॉकडाऊनमध्ये अडकले होते. मात्र आता हे कास पठार पर्यटकांसाठी खुलं करण्यात आलं आहे. (फोटो : राहुल तपासे)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजागतिक वारसा म्हणून नोंद असलेल्या या कास पठारावर आता पर्यटकांची लगबग दिसणार आहे(फोटो : राहुल तपासे)
सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यानंतर या परिसरात फुलांचा मोठा बहर दिसायला लागतो.(फोटो : राहुल तपासे)
जसेजसे दिवस बदलतील तसेतसे या पठारावर वेगवेगळ्या रंगांची चादर पाहायला मिळू लागते.(फोटो : राहुल तपासे)
निसर्गाची ही एक वेगळीच उधळण असते... आणि ही उधळण गेल्या दोन वर्षापासून लॉकडाउनच्या कचाट्यात अडकली होती(फोटो : राहुल तपासे)
मात्र आता वन विभाग आणि कास वन समितीच्या माध्यमातून हा निसर्गाचा ठेवा आता सर्वांसाठी खुला करण्यात आला आहे.(फोटो : राहुल तपासे)
या कास पठारावर येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला भरभरून निसर्गाचा आनंद दिला जावा यासाठी आता वन समिती ने एक वेगळीच शक्कल लढवली आहे(फोटो : राहुल तपासे)
येणाऱ्या पर्यटकांना खास बसची खास सोय केली असून या बसद्वारे या परिसरातील विविध पॉईंट दाखवले जाणार आहेत.(फोटो : राहुल तपासे)
कास पठारावरच्या फुलांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाल्याचं चित्र पाहायला मिळते. जी फुलं सप्टेंबर मध्ये येतात ती आत्ता फुललेली आहेत. (फोटो : राहुल तपासे)
तर जी फुलं शेवटच्या टप्प्यात फुलतात ती तळ्यातील कमळ म्हणजेच कुंमोदनी फुल हे सध्या उगवले आहे.(फोटो : राहुल तपासे)