Photo : गवार, भेंडी 120 रुपये किलो, कोणत्या भाज्याचा किती दर?
उत्पादनात घट झाल्यानं गेल्या आठवडाभरात भाजीपाल्याची आवक घटलीय. यामुळं भाज्यांच्या दरात 20 ते 30 रुपयांची वाढ (Vegetable prices) झालीय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवांग्याच्या दरात वाढ झाली आहे. प्रतिकिलो वांग्यासाठी 80 रुपये किलो
प्रतिकिलो भेंडीसाठी 120 रुपये मोजावे लागत आहेत.
कोबी 40 रुपये किलोवर गेला आहे.
वाटाण्याच्या दरातही वाढ धाली आहे. प्रतिकिलो वाटाण्यासाठी 60 ते 70 रुपये मोजावे लागत आहेत.
ढोबळी मिरचीच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. ढोबळी मिरचीचा दर प्रतिकिलोसाठी 90 रुपयांवर गेला आहे.
कार्ल्याच्या दरातही वाढ झाली आहे. कार्ले 80 रुपये प्रतिकिलोवर गेले आहे.
गाजर 50 रुपये प्रतिकिलोवर गेले आहे.
अवकाळी पावसामुळं पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यातच आता थंडी पडू लागल्यानं भाजीपाल्याच्या वाढीवर परिणाम होत आहे. दरम्यान, अशातच सर्वच भाजीपाला 90 ते 100 रुपयांवर गेला आहे.