परभणी शहरात तुफान पाऊस, सगळीकडे पाणीच पाणी
परभणी शहरात जोरदार पाऊस सुरु आहे. यामुळं शहरात सर्वत्र पाणीच पाणी झालं आहे.
Parbhani Rain news
1/10
परभणी शहरात सध्या जोरदार पाऊस कोसळत आहे.
2/10
या पावसामुळं सर्वत्र पाणीच पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
3/10
वसमत रस्ता,जिंतूर रस्ता गांधी पार्क अष्टभूजा मंदिर परिसर बेलेश्वर नगर येथे रस्त्यावर पाणीच पाणी
4/10
परभणी शहरात एक तास झालेल्या पावसाने पुन्हा एकदा शहरातील रस्त्यांवर पाणीच पाणी केल्याच चित्र पाहायला मिळालं शहरासह जिल्ह्यातील विविध भागांमध्ये मागच्या एक तासापासून विजांच्या कडकडाटा सहज जोरदार पाऊस बरसलाय.
5/10
एक तास झालेल्या या पावसामुळे शहरातील वसमत रस्ता त्याचबरोबर बरोबर जिंतूर रस्ता बेलेश्वर नगर गांधी पार्क अष्टभुजा देवी मंदिर परिसर या ठिकाणी रस्त्यावर जवळपास एक ते दीड फूट पाणी साचले होते.
6/10
अनेक वाहनही या पाण्यामध्ये बंद पडल्याचे चित्र पाहायला मिळालं.
7/10
परभणी शहर महानगरपालिकेचे नालेसफाईकडे सातत्याने होत असलेले दुर्लक्ष आणि शहरात साचलेला कचरा यामुळे पावसात शहरातील रस्त्यांवर नद्यांच स्वरूप प्राप्त झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
8/10
जोरदार पावसामुळं रस्त्यांवर पाणी साचलं आहे. त्यामुळं वाहतुकीवर देखील परिणाम होत आहे.
9/10
गेल्या सात ते आठ दिवसापासून राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे.
10/10
या पावसामुळंराज्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
Published at : 21 Sep 2025 10:58 PM (IST)