Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सावधान! 'या' भागात पडणार मुसळधार पाऊस
राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate Chnage) होतं आहे. पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाही ठिकाणी मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली आहे.
हवामान अभ्यासक पंजाबराव डख (Panjabrao Dakh) यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे 5 ते 8 जून दरम्यान राज्यातील काही भागात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यातील सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगावमध्ये पावसाची शक्यता
राज्यातील सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, परभणी, लातूर, नांदेड, हिंगोली, विदर्भातील यवतमाळ, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, उस्मानाबाद, सोलापूर, पंढरपूर या भागात चांगला पाऊस पडणार असल्याची माहिती डखांनी दिली आहे.
पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार 9 ते 14 जून दरम्यान राज्यातील सातारा, सांगली, पुणे, कोकण, नगर, नाशिक, मुंबई या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
मुंबई येथील काही भागात अतिवृष्टी होणार असा अंदाज आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी या भागातही या कालावधीत मुसळधार पावसाची शक्यता पंजाबराव डखांनी वर्तवली आहे.
महाराष्ट्रात आजपासून पावसाला सुरुवात झाली असून 14 जून पर्यंत राज्यात पाऊस सुरू राहणार आहे.
सध्या पडणारा पाऊस हा भाग बदलत पडणार पाऊस आहे. या कालावधीत राज्यातील काही भागांमध्ये पेरणी योग्य पाऊस होण्याची दाट शक्यता पंजाबराव डखांनी वर्तवली आहे.