Exit Poll 2024
(Source: Poll of Polls)
आज कुठं रेड तर कुठं ऑरेंज अलर्ट, वाचा हवामान विभागाचा अंदाज
राज्यातील बहुतांश भागात जोरदार पाऊस कोसळत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुसळधार पावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहे. धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.
मुंबईसह पुणे शहरात जोरदार पाऊस झाला आहे.
नदी आणि धरणांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.
रायगड, रत्नागिरी आणि सातारा या तीन जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबईसह ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
विदर्भातील अमरावती, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज कुठं रेड अलर्ट तर कुठं ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.