आज राज्यातील 'या' भागात जोरदार पावसाचा इशारा
राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate change) होत आहे. अनेक ठिकाणी जोरदार पावसानं (Rain) हजेरी लावल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआहे. काही ठिकाणी पावसामुळं जनजीवन देखील विस्कळीत झालं आहे.
आज राज्यातील हवामान नेमकं कसं राहिल याबाबतची माहिती हवामान विभागानं (Imd) दिली आहे. जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, पुढील 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात आकाश सामान्यतः ढगाळ राहील. हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, अकोल्यात हवामान खात्याचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित संपूर्ण महाराष्ट्रात हवामान खात्याने ग्रीन अलर्ट दिला आहे.
मुंबईत पुढील 24 तास ढगाळ वातावरण राहील असे हवामान खात्याच्या वतीने माहिती देण्यात आले आहे.
18 जून नंतर मात्र मुंबईत पावसाला सुरुवात होईल असंही सांगण्यात आलं आहे.
पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता
आज आणि उद्या पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता पंजाबराव डखांनी वर्तवली आहे.
विदर्भात तब्बल 22 जून पर्यंत पाऊस सुरू राहणार असल्याची माहिती डखांनी दिली आहे.