उष्माघातापासून सावधान! भंडाऱ्यात आज 41अंश, विदर्भात तापमानाचा उच्चांक, नागरिकांना असह्य उन्हाचा चटका, वेधशाळेचा इशारा

राज्यात विदर्भ वगळता उत्तर महाराष्ट्र मराठवाडा अन् मध्य महाराष्ट्रात येत्या काही दिवसात पावसाचे इशारे देण्यात आले आहेत.

Continues below advertisement

Vidarbha Temperature Alert

Continues below advertisement
1/10
राज्यात सध्या तापमानाचा उच्चांक पहायला मिळत आहे.
2/10
विदर्भात तापमानाच्या काळपट छटा दिसू लागल्या आहेत. दुपारच्या वेळी घराबाहेर पडणं अशक्य झालंय.
3/10
28 मार्च रोजी विदर्भात सर्वाधिक तापमानाची नोंद होत असून बहुतांश ठिकाणी 40 अंशांच्या पुढे तापमान वाढले आहे.
4/10
प्रचंड रखरख, उन्हाच्या झळा आणि तापमानाचा चटका नागरिकांना सहन करणं असह्य होत आहे.
5/10
भंडाऱ्यात आज यावर्षीच्या सर्वाधिक ४१ अंश सेल्सिअस तर, किमान तापमान २९ अंश सेल्सिअस तापमान राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तविला आहे.
Continues below advertisement
6/10
विदर्भ वगळता आता येत्या तीन ते चार दिवसात उत्तर व मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात अवकाळी पावसाचे इशारे देण्यात आले आहेत.
7/10
भंडारा जिल्ह्यात आज दिवसभर आकाश नीरभ्र राहणार असून तापमानात वाढ होणार असल्यानं नागरिकांनी महत्वाचं काम असल्यासचं घराबाहेर पडावं, असं आवाहन नागरिकांना केलं आहे
8/10
उष्माघातापासून बचाव करण्यासाठी शक्यतो दुपारी १२ ते ४ दरम्यान उन्हात निघणे टाळावे. उन्हात निघत असताना डोके, कान, नाक कापडानं झाकूनचं बाहेर निघावं.चहा, कॉफ़ी व कॅफीनयुक्त शितपेय घेणे टाळावं.
9/10
मुबलक प्रमाणात पाणी प्यावं.तब्येत अस्वस्थ वाटल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा.जनवारांना सावलीत ठेवावं व वेळोवेळी पाणी द्यावं.
10/10
उष्माघातग्रस्त व्यक्ती आढळल्यास तात्काळ 108 वर संपर्क करावं.
Sponsored Links by Taboola