Governor Acharya Devvrat: राज्यपाल येती घरा... शेतकऱ्याच्या सारवलेल्या घरात महामहिमांनी खाली बसून केलं जेवण; साधेपणाचे फोटो व्हायरल
Governor Acharya Devvrat: राज्यपाल आचार्य देवव्रत दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आले होते. पिंपरखेड गावी त्यांनी मुक्काम करून गावकऱ्यांशी संवाद साधला.
Continues below advertisement
Governor Acharya Devvrat
Continues below advertisement
1/6
राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी दिंडोरी तालुक्यातील पिंपरखेड गावात एका शेतकरी कुटुंबाच्या घरी जाऊन पारंपरिक जेवणाचा आस्वाद घेतला, हा प्रसंग गावकऱ्यांसाठी अविस्मरणीय ठरला.
2/6
हिरामण शंकर साबळे यांच्या साध्या घरात राज्याच्या प्रथम नागरिकांनी पाय ठेवताच साबळे कुटुंब भारावून गेले, आनंदाश्रूंनी वातावरण भरून आले.
3/6
राज्यपाल येणार असल्याची माहिती मिळताच साबळे कुटुंबाने घराची रंगरंगोटी केली, प्रवेशद्वारावर आकर्षक वारली चित्रकला साकारण्यात आली.
4/6
साबळे कुटुंबातील गोजरताई यांनी पारंपरिक आदिवासी आणि ग्रामीण पदार्थांची खास मेजवानी तयार केली.
5/6
या मेजवानीत लाल, पांढरी नागली व बाजरीची भाकरी, उडीदाचे वरण, हरभऱ्याची भाजी, अळू आणि वर्कण कंदाची भाजी यांचा समावेश होता.
Continues below advertisement
6/6
राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी अत्यंत साधेपणाने जमिनीवर बसून कुटुंबीयांसोबत जेवणाचा आस्वाद घेतला, यामुळे उपस्थितांना विशेष भावनिक अनुभव आला.
Published at : 02 Jan 2026 02:26 PM (IST)