Ganeshotsav: गणेश विसर्जनानंतर येतोय साखर चौथ गणेशोत्सव; काय आहे परंपरा?
गणपती बाप्पांचे मोठ्या थाटामाटात घरोघरी स्वागत झाले, तसेच सार्वजनिक गणेश मंडळाताही धुमधडाक्यात बाप्पा विराजमान झाले होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगेल्या 10 दिवस सर्वत्र गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळाली. घरोघरी आणि मोठ्या शहरातही गणेशोत्सावाचा उत्साह पाहायला मिळाला. मात्र, भावूक वातावरणात बाप्पांना निरोपही देण्यात आला.
दीड दिवस, 5 दिवस, 7 दिवस बाप्पांची पूजा करुन अनंत चतुदर्शी दिवशी देशभरातील गणपती बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. प्रशासनाने बांधलेल्या कृत्रिम ठिकाणी, तसेच समुद्र, तलाव आणि विविध जलाशयांत बाप्पांचे विसर्जन करण्यात आले.
गणपती बाप्पांचे विसर्जन झाल्यानंतर कोकणात साखर चौथ गणेशोत्सव साजरा करण्याची पद्धत आहे. यावेळी, गणपती बाप्पांचे वाजत गाजत घरी स्वागत केले जाते.
अनंत चतुर्थीचे गणपती विसर्जन झाल्यानंतर येणाऱ्या पहिल्याच संकष्ट चतुर्थीला साखर चौथ गणेशोत्सव साजरा केला जातो. हा गणेशोत्सव दीड दिवसांचा असतो.
कोकणात देखील साखर चौथचे गणपती बाप्पा रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड,पेण, पनवेल, उरण, अलिबाग, रोहा, माणगाव, महाड आदी सर्वच तालुक्यात हा गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे.
गावो गावी सार्वजनिक तसेच घरगुती पद्धतीने साखर चौथ गणपती बाप्पांचे आगमन होते. या दिड दिवसांच्या बाप्पाला आज रायगड जिल्ह्यांत ठिकठिकाणी निरोप देऊन विसर्जन केलं जातंय.