Ganesh Chaturthi 2022 : आतुरता आगमनाची, लगबग बाप्पाच्या स्वागताची, बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गर्दी
Ganesh Chaturthi 2022 : हिंदू धर्मामध्ये श्री गणेशाला आराध्यदैवत मानलं जातं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयंदा गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi 2022) 31 ऑगस्ट रोजी आहे.
लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी अवघे काही तास उरले आहेत.
उद्या श्री गणेश चतुर्थीला गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे.
गणेशभक्तांमध्ये श्री गणेशाच्या आगमनाची आतुरता पाहायला मिळत आहे.
दोन वर्षांनंतर कोरोनाच्या निर्बंधातून मुक्त झाल्यावर गणेशोत्सवाची देशभरात धूम पाहायला मिळतेय.
श्री गणेश चतुर्थीचा उत्साह केवळ भारतातच नाहीतर जगभरात पाहायला मिळतो.
भारतात श्री गणेश चतुर्थीला गणपतीच्या आगमनापासून अनंत चतुर्दशीला बाप्पाच्या विसर्जनापर्यंत चालणारा अकरा दिवसांच्या या जंगी उत्सवाची मजा काही वेगळीच असते.
बाप्पाच्या आगमनाची तयारी शेवटच्या टप्प्यात आहे.
बाजारांमध्ये खरेदीसाठी लगबग पाहायला मिळत आहे.
बाजार रंगीबेरंगी फुलांनी आणि सजावटीच्या सामानानं फुलली आहेत.
खरेदीसाठी गणेशभक्तांची रीघ लागली आहे.
आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनात काहीही कमी राहू नये, यासाठी गणेशभक्तांची लगबग सुरु आहे.