पुण्याच्या सदाशिव पेठीतील चव्हाण वाड्याला आग; घरातील साहित्य जळून खाक

पुण्याच्या सदाशिव पेठीतील चव्हाण वाड्याला आग लागल्याची घटना घडली आहे.

Continues below advertisement

Pune Fire News

Continues below advertisement
1/10
पुण्यात आज रात्री आठ वाजता 1291 सदाशिव पेठ, चव्हाण वाडा याठिकाणी आग लागल्याची घटना घडली.
2/10
या घटनेची माहिती मिळताच अग्निशमाक दलाकडून पाच वाहने दाखल झाली.
3/10
सध्या आग विझवण्याचे काम सुरु असून, आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे.
4/10
घटनास्थळी एक मजली वाडा आहे. यामध्ये एकूण चार कुटुंबे राहात होती.
5/10
सदर ठिकाणी छतावर आग लागल्याचे निदर्शनास येताच कुटुंबातील रहिवाशांनी अग्निशमन दलास पाचारण करीत वाड्याबाहेर धाव घेतली.
Continues below advertisement
6/10
अग्निशामक दलाच्या जवानांनी आग व धूर मोठ्या प्रमाणात असल्याने वाड्यात आतमध्ये प्रवेश करून प्रथम कोणी अडकले नाही खाञी करीत तीन सिलेंडर बाहेर काढले.
7/10
आगीवर पाणी मारून सुमारे वीस मिनिटात आग आटोक्यात आणून कुलिंगचे काम सुरु ठेवले आहे.
8/10
आग इतरत्र पसरु न देता मोठा धोका टळला आहे. या आगीमध्ये घरातील सर्व साहित्य जळाले असून खाली असणाऱ्या दुकानदारांनी त्वरीत मालाचा साठा बाहेर घेतल्याने नुकसान टळले आहे.
9/10
आग नेमकी कशामुळे लागली याचे निश्चित कारण समजू शकले नसून जखमी वा जिवितहानी नाही.
10/10
अग्निशामक दलाच्या जवानांनी आग व धूर मोठ्या प्रमाणात असल्याने वाड्यात आतमध्ये प्रवेश करून प्रथम कोणी अडकले नाही खाञी करीत तीन सिलेंडर बाहेर काढले.
Sponsored Links by Taboola