Photos : अठराव्या शतकातील कुलूप, अमरावतीच्या अचलपूरमधील कुटुंबाकडे दुर्मिळ वस्तूंचा खजिना
अमरावती जिल्ह्यातील अचलपूरचे गोपालदास झंवर आणि ब्रिजमोहन झंवर या दोन बंधूंनी हे अठराव्या शतकातील एक आगळं वेगळं आणि विश्वास बसणार नाही असं लॉक जपून ठेवले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपेशाने कास्तकार (शेतकरी) असणाऱ्या या झंवर कुटुंबीयांनी अनेक दुर्मिळ आणि पुरातन वस्तूंचे संग्रह केला आहे.
यात हाय सिक्युरिटी लॉक, वाळूचा उपयोग करून तयार केलेली स्टॉप वॉच, बांबूचा उपयोग करून तयार केलेली ज्वेलरी बॉक्स अशा अनेक गोष्टी अनेकांना भुरळ घालणारे आहे.
झंवर कुटुंबाकडे दुर्मिळ वस्तूंचा खजिना आहे.
त्यासोबतच पाच मिनिटं आणि एक तास इतका वेळ चालणारी वाळूची घड्याळं देखील झंवर यांनी जतन करून ठेवली आहेत. आजही ह्या सर्व वस्तू अगदी सुस्थितीत असून त्यामध्ये कुठलाही बिघाड आला नसल्याचं गोपाल झंवर यांनी सांगितलं.
निजामाची राजधानी असलेले अचलपूर पूर्वीचे जैनधर्मीयांच्या काळातील अलयपूर, निजाम राजवटीतील एलीचपूर ऐतिहासिक शहराला जवळपास 5 किमी परिघाचा परकोट म्हणजे संरक्षक भिंत आहे. त्याला 6 महाद्वार आहे.
परकोटाला असलेल्या दरवाजाचा मूळ उद्देश शत्रूपासुन संरक्षण करणे हा दुय्यम उद्देश असून या संरक्षक भिंतीमुळे पूर्वी वर्हाडातील ऐलीचपुर ही सोने, मोती, हिरे यांची मुख्य बाजारपेठ असल्याने कडक सुरक्षा असायची.