PHOTO : धाराशिवमध्ये आभाळ फाटलं, 24 जणांना हेलिकॉप्टरने रेस्क्यू, बीडमध्येही पावसाचा धुमाकूळ, धडकी भरवणारे दृश्य

Dharashiv Beed Rain : धाराशिव जिल्ह्यातील भूम-परंडा परिसरात पूरस्थिती गंभीर बनली आहे. तर बीडमध्ये अनेक गावात पूरस्थिती निर्माण झाली आहे.

Continues below advertisement

Dharashiv Beed Rain

Continues below advertisement
1/10
बीड जिल्ह्यात मध्यरात्री मुसळधार पावसाने दाणादाण उडवली असून बीड, शिरूर, पाटोदा, आष्टी आणि गेवराई तालुक्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. अनेक गावं अजूनही पाण्यात वेढलेली आहेत.
2/10
ढगफुटी सदृश पावसामुळे पाटोदा तालुक्यातील उखंडा तलाव आणि सिंधफना नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.
3/10
नदीकाठच्या गावांमध्ये पुराचे मोठे संकट उभे ठाकले आहे.
4/10
शिरूर तालुक्यातील शिरापूर गावात पाच नागरिक पुराच्या पाण्यात अडकले होते. NDRF टीमने धाडसाने त्यांची सुखरूप सुटका केली.
5/10
धाराशिव जिल्ह्यातील भूम-परंडा परिसरातही पूरस्थिती गंभीर बनली आहे. काही भागांमध्ये मिलिटरीच्या हेलिकॉप्टरने नागरिकांचा रेस्क्यू सुरू आहे.
Continues below advertisement
6/10
परांडा तालुक्यातील देवगाव वडनेर येथून 24 नागरिकांची यशस्वी सुटका करण्यात आली आहे. मात्र अजूनही पाच जण पाण्यात अडकले असल्याची माहिती मिळतेय.
7/10
हेलिकॉप्टर ऑपरेशनला सतत पडणाऱ्या पावसामुळे अडथळे येत आहेत. त्यामुळे काही ठिकाणी बचाव कार्यासाठी मिलिटरीच्या बोटी उतरवण्यात येत आहेत.
8/10
उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः या संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशनवर लक्ष ठेवून आहेत. त्यांनी प्रशासनाला सतत मदतीच्या सूचना दिल्या आहेत.
9/10
प्रशासनाकडून तातडीने पावले उचलली जात आहेत.
10/10
NDRF, SDRF, पोलिस, स्थानिक प्रशासन आणि लष्कर एकत्र काम करत असून पूरग्रस्तांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
Sponsored Links by Taboola