PHOTO : डेक्कन क्वीन अर्थात दख्खनच्या राणीचा 92 वा वाढदिवस दणक्यात!
Deccan Queen Birthday
1/5
मुंबईहून सुटणारी डेक्कन क्वीन या लेजेंडरी एक्सप्रेसचा आज वाढदिवस आहे. डेक्कन क्वीनला 92 वर्षे पूर्ण झाली. डेक्कन क्वीनने 1 जून 1930 रोजी आपला पहिला प्रवास सुरु केला होता.
2/5
पुणे-मुंबई-पुणे असा प्रवास करणारी ही गाडी दोन्ही शहरांच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. कित्येक वर्षे डेक्कन क्वीनने दररोज पुणे-मुंबई-पुणे प्रवास करणारे प्रवासी आहेत.
3/5
कोरोनामुळे सलग दोन वर्षे वाढदिवसाला डेक्कन क्वीनचा रेक मुंबई यार्डातच होता. यावेळी इंजिनचं पूजन करत चालकाचा सत्कार देखील करण्यात आला आणि त्यानंतर ही गाडी मार्गस्थ झाली.
4/5
येत्या 22 जून पासून या गाडीचे जुने डबे बाजूला करुन नवीन रंगसंगती आणि सोयी सुविधा असलेले एल एच बी प्रकारातील डबे जोडण्यात येणार आहेत.
5/5
या गाडीचे वैशिष्ट्य म्हणजे ही भारतातील एकमेव अशी गाडी आहे ज्यात डायनिंग कार आहे, म्हणजेच चालत्या गाडीत हॉटेलसारखे बसून खाण्याची सोय आहे.
Published at : 01 Jun 2022 04:09 PM (IST)