Cyclone Tauktae | तोक्ते चक्रीवादळाचे रायगड जिल्ह्यात थैमान, डोळ्यादेखत अनेकांचे संसार उध्वस्त, मन हेलावून टाकणारे फोटो
तोक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर समुद्रकिनाऱ्यावरील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातील 12 हजार 420 नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरत्नागिरी जिल्ह्यातील 3 हजार 896, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 144 आणि रायगड जिल्ह्यातील 8 हजार 380 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केलं आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे.
तोक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर रायगड जिल्ह्याला रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांच्या बचाव आणि मदतकार्यासाठी संबंधित जिल्हा तसंच राज्य प्रशासनाने संपूर्ण तयारी केली आहे.
तोक्ते चक्रीवादळाचा प्रभाव रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावर मध्यरात्रीनंतर जाणवू लागला.
सर्वत्र सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस असे चित्र दिसत आहे. या दरम्यान जिल्ह्यातील आज सकाळी नऊ वाजेपर्यंत झालेल्या नुकसानीची माहिती जिल्हा प्रशासनाने जाहीर केली आहे.
आतापर्यंत एकूण 23.42 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यातील 839 घरांचं अंशत: नुकसान झाले आहे. एका व्यक्तीचा मृत्यू आणि दोन व्यक्ती जखमी झाल्याची नोंद झाली आहे. त्याचबरोबर एका प्राण्याचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.
रायगड जिल्ह्यातील एकूण 2 हजार 263 कुटुंबांचे मिळून एकूण 8 हजार 383 व्यक्तींचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे.
तोक्ते चक्रीवादळामुळे श्रीवर्धन परिसरातील आंबा व्यापारी आणि बागायतदार यांचं नुकसान झालं आहे. अजूनही मे महिना संपलेला नाही त्यामुळे अनेक ठिकाणी आंबा अजूनही झाडावर आहे.
श्रीवर्धन जवळच्या काळींजे गावातील आंबा व्यापारी निवृत्ती देवकर म्हणाले की, मागच्या वर्षी आंबा होता पण वाहतूक व्यवस्था नव्हती त्यामुळे आंबा पडून राहिला. यावर्षी आंबा आहे, वाहतूक व्यवस्था देखील आहे. परंतु, आता या वादळाने फळांचं नुकसान केलं. त्यामुळे विक्री कुठून करणार? कालपासून अनेक ठिकाणी आंबा गळून पडल्याचं पाहायला मिळत आहे.
तोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्हा अंधारात गेला आहे. जिल्ह्यातील बहुतांशी भागात विजेच्या खांबांवर झाडं कोसल्यामुळे विद्युत पुरवठा ठिकठिकाणी खंडित झाला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात तौक्ते चक्रीवादळामुळे 447 घरांचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी दिली आहे.
स्थानिक नागरिक त्या त्या ठिकाणी झाडं तोडून मार्ग सुखकर करण्याचा प्रयत्न करत आहेत.
जिल्ह्यातील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी दोन दिवस जाऊ शकतात. तोक्ते चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील रस्त्यावर झाडं कोसळली आहेत. त्यामुळे बहुतांशी रस्ते बंद आहेत.
अनेक ठिकाणी झाडे पडल्यामुळे वाहनांचे नुकसान झालं आहे.
तसंच 37 गोठ्यांचे नुकसान झालं आहे. 143 ठिकाणी झाडे पडली असून 3 शाळांचे, 10 शेडचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
तसंच 37 गोठ्यांचे नुकसान झालं आहे. 143 ठिकाणी झाडे पडली असून 3 शाळांचे, 10 शेडचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.