समृद्धी महामार्गावर शिर्डीला दर्शनाला निघालेल्या भाविकांची क्रूझर पलटली, मागून क्रेटाची धडक, दोघांचा मृत्यू,6 गंभीर जखमी

समृद्धी महामार्गावर भाविकांची भरधाव क्रुझर कार टायर फुटल्याने पलटी होऊन भीषण अपघात झाला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
या अपघातात दोन जण ठार झाले, तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.

ही दुर्घटना शनिवारी सकाळी ८.४५ वाजता मुंबई कॉरिडॉरवरील चेनेज ३४४.६ वर घडली.
अपघातानंतर क्रुझर महामार्गावर उलटली, त्याच वेळी पाठीमागून येणाऱ्या क्रेटा कारने तिला धडक दिली. या दुहेरी अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली.
माहिती मिळताच वाहतूक पोलीस आणि आपत्कालीन पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केले.
या दुर्घटनेत विद्या साबळे आणि मोतीराम बोरकर या दोन भाविकांचा मृत्यू झाला. तर इतर सहा जण जखमी झाले असून त्यातील तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
अपघातग्रस्त क्रुझरमधील सर्व भाविक प्रवासी यवतमाळ येथून शिर्डीला साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी निघाले होते.