Temple Crowd : नवीन वर्षाची देवदर्शनाने सुरुवात; सिद्धीविनायक, पंढरपूर, शिर्डीमध्ये भक्तांची मांदियाळी
2023 हे नवीन वर्ष सुखासमाधानाचं जावं अशी प्रत्येक जण देवाकडे प्रार्थना करत आहे. राज्यासह देशभरात प्रसिद्ध मंदिरांमध्ये भक्तांची गर्दी पाहायला मिळत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर, पुण्यातील दगडूशेठ मंदिर, शिर्डीतील साईबाबा मंदिर, कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर, शेगावातील गजानन महाराज मंदिरात पहाटेपासूनच भक्तांची मांदियाळी पाहायला मिळत आहे.
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी विट्ठल, रखुमाई मंदिराला आकर्षक फळे आणि फुलांची सजावट करण्यात आली आहे.
मंदिर चौखांबी, सोलाखांबी , रुक्मिणी चौखांबी येथे या फुले आणि फळांनी मनमोहक सजावट केली आहे. आळंदी येथील भाविक प्रदीप ठाकूर यांनी ही सजावटीची सेवा केली आहे.
यामध्ये सफरचंद, डाळिंब, बोरे, मोसंबी सह विविध फळांचा वापर या सजावटीत करण्यात आली आहे. झेंडू, गुलाब, आर्चेड, गुलछडी, मोगरा, शेवंती आशा फुलांच्या रंगसंगतीचा वापर या सजावटीत करण्यात आला आहे
नववर्षाची सुरुवात साईबाबांच्या दर्शनाने करण्यासाठी साईभक्तांनी मोठी गर्दी केली आहे. साई मंदिर रात्रभर खुले असल्याने गर्दीचा ओघ काल पासूनच सुरू आहे.
साई नामाचा जयघोष करत लाखो भाविकांनी मध्यरात्री नववर्षाचे जल्लोषात स्वागत केले. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी अत्यंत भक्तिमय वातावरणात साईभक्त साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेऊन नवीन वर्षाचे स्वागत करत आहे.
वर्षाचा पहिलाच रविवार असल्याने आज दिवसभर भाविकांची मोठी गर्दी शिर्डीत राहणार आहे.
कोल्हापूरमधील श्री करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात अंबाबाईचे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केलीय.