Photo : डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात 'थंडी'चा जोर वाढणार
राज्यात कुठे ढगाळ वातावरण आहे तर कुठे थंडीचा जोर वाढल्याचे पाहायला मिळत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचालू डिसेंबर महिन्यात थंडीचा जोर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुढच्या दोन ते तीन दिवसानंतर राज्यात थंडी वाढणार असल्याचा अंदाज ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे.
. पुढील तीन दिवस साधारण थंडीबरोबर तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यताही नाकारता येत नसल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.
दक्षिण मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या सहा जिल्ह्यात तापमान सरासरीपेक्षा वाढले आहे. साधारणत: दोन ते चार अंश सेल्सिअसने तापमान वाढलं आहे. त्यामुळं या जिल्ह्यांमध्ये विशेष थंडी जाणवणार नाही.
तीन डिसेंबरनंतर दक्षिण मध्य महाराष्ट्रात हळूहळू थंडीचा जोर वाढणार असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.
उत्तर महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगांव आणि नाशिक या चार जिल्ह्यात थंडीचा जोर वाढणार असल्याची माहिती माणिकराव खुळे यांनी दिली. या ठिकाणी तापमानाचा पारा घसरला असल्यानं नागरिकांमध्ये हुडहुडी भरली आहे.
संपूर्ण विदर्भात थंडीचा पारा वाढला आहे. विदर्भात थंडीचा कडाका वाढल्यानं ठिकठिकाणी शेकोट्या पेटवल्या आहेत. थंडीचा परा आणखी वाढण्याची शक्यता माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली आहे.
मराठवाड्यात तापमानाचा पारा घसरला आहे. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात थंडीचा जोर वाढला आहेय तिथेही ठिकठिकाणी शेकोट्या पेटलेल्या दिसत आहेत.
मराठवाड्यात तापमानाचा पारा दोन ते चार अंश सेल्सिअसने घसरला आहे. सध्या मराठवाड्यात आठ ते 10 अंश सेल्सिअस तापमान आहे. सात डिसेंबरपर्यंत थंडीचा जोर कायम राहणार असल्याची माहिती माणिकराव खुळे यांनी दिली आहे.
राज्यात वाढत्या थंडीचा शेतीच्या पिकांना देखील फटका बसत आहे. थंडीचा कडाका वाढल्याने लोकांनी जागोजागी शेकोट्या पेटवल्या आहेत.