In Pics | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून लोणार सरोवराची पाहणी आणि विकासाबाबत चर्चा
वनसंपदा धोक्यात येऊ नये, यासाठी मर्यादित प्रवेश ठेवावा असं म्हणत लोणार सरोवराचा विकास रणथंबोरच्या धर्तीवर होऊ शकतो का याची पडताळणी करावी हा मार्गही त्यांनी सुचवला. (छाया सौजन्य- @CMOMaharashtra/ ट्विटर)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलोणार सरोवर हे जैवविविधतेचे भांडार आहे. या सरोवराचा विकास करताना एक निश्चित नियोजन तयार करावे, त्यानुसार आराखडा तयार करावा आणि त्याची काटेकोर अंमलबजावणी केली तरच हे सरोवर पर्यटनासाठी नावारूपास येईल, असं मत त्यांनी या भेटीदरम्यान मांडलं. (छाया सौजन्य- @CMOMaharashtra/ ट्विटर)
उद्धव ठाकरे यांनी वनकुटी व्ह्यू पॉईंट येथून लोणार सरोवराची पाहणी केली. यावेळी त्यांनी लोणार सरोवराची माहिती जाणून घेतली. (छाया सौजन्य- @CMOMaharashtra/ ट्विटर)
लोणार सरोवरासोबतच मुख्यमंत्र्यांनी दैत्य सूदन मंदिर परिसराचीही पाहणी केली. (छाया सौजन्य- @CMOMaharashtra/ ट्विटर)
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शुक्रवारी बुलढाणा आणि औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. याच दौऱ्यादरम्यान त्यांनी लोणार सरोवर आणि इतरह काही महत्त्वाच्या ठिकाणांना भेट देत या ठिकाणांची पाहणी केली. (छाया सौजन्य- @CMOMaharashtra/ ट्विटर)
भविष्यात या ठिकाणांचा पर्यटनाच्या दृष्टीनं कसा विकास केला जाईल, याबाबतही चर्चा केली. (छाया सौजन्य- @CMOMaharashtra/ ट्विटर)
सदर भागात मंदिरांची संख्या अधिक असल्याने वन पर्यटन किंवा मंदिराच्या भेटी यापैकी एका पर्यायाची निवड करून त्याच प्रस्तावावर काम करावं असा पर्यायही त्यांनी सुचवला. (छाया सौजन्य- @CMOMaharashtra/ ट्विटर)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -