Gayran Encrochment in kolhapur : मुख्यमंत्री कोल्हापुरात 'गायरान'वर बोलले, धास्तावलेल्या अतिक्रमणधारकांना दिलासा मिळणार का?

सर्वसामान्यांचे हीत जोपासण्यासाठी या शासनाने अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. या पुढेही राज्याच्या सर्वसमावेशक विकासासाठी जनहिताचे निर्णय घेतले जातील अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

Gayran Encrochment in kolhapur

1/11
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी कोल्हापूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी कोल्हापूरमध्ये सुमंगलम महोत्सवाच्या बोधचिन्हाचे अनावरण केले तसेच जयसिंगपूरमध्ये शेतकरी मेळावाही पार पडला.
2/11
कोल्हापूर जिल्ह्यात गायरान मुद्यावरून वातावरण तापलं आहे.
3/11
जयसिंगपूरमध्ये बोलताना मुख्यमंत्र्यांनी मुदतवाढ घेऊन गायरान जमिनीतील अतिक्रमणधारकांना दिलासा देण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले.
4/11
कोल्हापूर जिल्ह्यात गायरान क्षेत्र जवळपास 23 हजार हेक्टर असून दीड हजार हेक्टरवर अतिक्रमण केल्याचे बोलले जात आहे.
5/11
कोल्हापूर जिल्ह्यात 1 हजार 25 गावांपैकी 342 ग्रामपंचायतींमध्ये 23 हजार 344 जणांनी अतिक्रमण केल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे.
6/11
मात्र, हा आकडा सव्वा लाखाच्या घरात असल्याचे बोलले जात आहे. ही सर्व अतिक्रमण हटवल्यास जिल्ह्यात 6 लाखांवर बेघर होणार आहेत.
7/11
त्यामुळे मतदारसंघातील राजकारण्यांसह अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले आहेत.
8/11
पंचगंगा प्रदूषणमुक्ती तसेच महापुराच्या कचाट्यातून या भागाची मुक्तता करण्यासाठी प्रयत्न करू, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
9/11
शेतकरी, कष्टकरी, कामगार यांच्या कष्टाची जाणीव असणारे हे सर्वसामान्यांचे सरकार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
10/11
सर्वसामान्यांचे हीत जोपासण्यासाठी या शासनाने अनेक महत्वाचे निर्णय घेतले असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
11/11
पुढेही राज्याच्या सर्वसमावेशक विकासासाठी जनहिताचे निर्णय घेतले जातील अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
Sponsored Links by Taboola