आपल्या सेवेत 'छत्रपती भवन'; मनोज जरांगेंच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन, पाहा फोटो
मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आता आरक्षणाची पुढील लढाई कार्यालयातून सुरू केली आहे. दसरा मेळाव्यापूर्वीच त्यांच्या कार्यालयाचं उद्घाटन होत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजालना येथे मनोज जरांगे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्या उद्घाटन नारायण गडाचे महंत श्री शिवाजी महाराज यांच्या हस्ते होत आहे. या कार्यालयाचे नाव 'छत्रपती भवन' असे ठेवण्या आलंय.
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्या उद्घाटन होत आहे, धुळे सोलापूर महामार्गावर शहागड येथील पैठण फाटा येथे हे जनसंपर्क कार्यालय मराठा आंदोलकांसाठी खुले होत आहे.
नारायण गडाचे महंत श्री शिवाजी महाराज यांच्या हस्ते याचं उद्घाटन होणार आहे, गेल्या अनेक दिवसापासून याचं काम सुरू होतं, उद्यापासून मनोज जरांगे यांचा नवीन पत्ता हा अस्तित्वात येणार आहे.
दरम्यान, नारायण गडावरील दसरा मेळावाच्या निमित्ताने मनोज जरांगे हे धाराशिव आणि परभणी जिल्ह्यातील आंदोलकांसोबत बैठक घेणार आहेत.तसेच, दसरा मेळाव्याची पुढील रणनीती येथूनच आखली जाईल.
मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकांत काय भूमिका घ्यायची हे अद्याप निश्चित केलं नाही. मात्र, पुढील काही दिवसांत ते भूमिका जाहीर करणार आहेत.
image 6