Chandrayaan-3 : मानवी साखळी...प्रार्थनेपासून ते अंतराळ विषयक कार्यशाळा...राज्यभरात चांद्रयान मोहिमेचा उत्साह; पाहा फोटो
परभणीच्या गंगाखेड येथे पुजा-प्रार्थना करण्यात आली. येथील सुप्रसिद्ध कलाकार विश्वनाथ कांबळे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'चांद्रयान-3' चे प्रक्षेपण झाले त्या दिवशी सुद्धा विद्यार्थ्यांना लाईव्ह प्रक्षेपण दाखवण्यात आले होते.आजच्याही चंद्रयानाचा उतरण्याचा लाईव्ह आनंद विद्यार्थी घेणार आहेत.
शहरातील मुख्य चौकात चांद्रयानाची प्रतिकृती तयार करून त्याची पूजा करून सर्वांनी प्रार्थना केली..मोठ्या संख्येने गंगाखेडकर यावेळी उपस्थित होते.
नाशिकच्या चांदवड येथील नूतन माध्यमिक विद्यालयाचे कलाशिक्षक देव हिरे यांनी फलक रेखाटनातुन भारतीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.
पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड पालिकेच्या तारांगण केंद्रात विज्ञानाचे शिक्षक आणि विद्यार्थी स्वतः चांद्रयान तीन ची प्रतिकृती साकारत आहेत.
चंद्रावर इस्त्रो पाठविलेल्या 'चांद्रयान-3' चे पाऊल आज पडणार आहे. त्याचेच औचित्य साधून प्रसिद्ध सुलेखनकार अच्युत पालव यांनी चांद्रयान ३ सबंधित संदेश विद्यार्थ्यांसह छत्रीवर साकारले.
मुलुंडच्या सौ. लक्ष्मीबाई इंग्लिश मिडीयम स्कूल येथे आज शाळेचे संचालक प्रसाद कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून ही छत्री रंगविण्याची कार्यशाळा शाळेत घेण्यात आली.
या वेळी सुलेखनकार अच्युत पालव यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यशाळेत छत्र्या रंगविण्याचा अनुभव घेताना मुले अगदी तल्लीन झाली होती. स्वत: तयार केलेल्या छत्रीचा 'आनंद मुलांच्या चेहयावर दिसून आला.
चांद्रयान-3 च्या लँडिंगसाठी यवतमाळमध्ये भाजपच्या नेत्यांनी केदारेश्वर मंदिरात अभिषेक केला.