जालन्यात भगवं वादळ! मनोज जरांगे पाटलांच्या रॅलीला तुफान गर्दी, ड्रोनची दृश्य एबीपी माझावर
आज जालन्यात मनोज जरांगे यांच्या शांतात रॅलीला सुरुवात झाली आहे. याचे एक्सकल्युजिव ड्रोन दृश्य
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजालना येथे मनोज जरांगे यांच्या होम ग्राउंडवरती शांतता रॅलीला सुरुवात झाली आहे. या रॅलीला लोकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
रॅलीमध्ये हजारो आंदोलक सहभागी झाले आहेत. जालना शहरातील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यापासून या रॅलीला सुरुवात झाली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ या रॅलीचा समारोप होणार आहे. या रॅलीचे एकस्कलुजिव ड्रोन दृश्य एबीपी माझावर
सध्या मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅली काढत आहेत. आज त्यांची रॅली जालन्यात होत आहे.
मराठ्यांना आर७ण मिळाल्याशिवाय लढा माघार घेणार नसल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
मनोज जरांगे पाटील यांच्या रॅलीला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. जालन्यात सर्वत्र भगवं वातावरण तयार झालं आहे.
जालन्यातील लोकांनी मनोज जरांगे पाटील यांचं जंगी स्वागत केलं आहे. सध्या वाजत गाजत रॅलीला सुुरुवात झाली आहे.
ठिकठिकाणी मनोज जरांगे यांचे जेसीबी आणि मोठ्या फुलांचे हार घालून स्वागत ोहत आहे. .
मनोज जरांगे पाटील यांच्या रॅलीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.