Bhagat Singh Koshyari : भगतसिंह कोश्यारींच्या राजीनाम्यावर कोण काय म्हणाले?

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी भारतीय जनता पक्षाचे राजभवनातले एजंट म्हणून काम केल्याची टीका शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली. राज्यपालांनी महाविकास आघाडी सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
आता रमेश बैस हे राज्याचे नवीन राज्यपाल असणार आहेत. ते यापूर्वी झारखंडचे राज्यपाल होते.

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांचा राजीनामा (Resignation) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर केला आहे.
देर आए दुरुस्त आए अशा शब्दात शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी भगतसिंह कोश्यारी यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
महापुरुषांचा अवमान करणाऱ्या आणि राज्यघटनेच्या विरोधात काम करून घटनाबाह्य सरकारला शपथ देणाऱ्या महोदयांमुळे राज्यपालपदाची शोभा कमी झाली आहे. महाविकास आघाडीची राज्यपाल बदलण्याची मागणी होतीच, म्हणूनच महाराष्ट्रात नवीन राज्यपाल येणार या वृत्ताचे आम्ही स्वागत करतो.
महाविकास आघाडीच्या आंदोलनाला अखेर यश आल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलं आहे.
राज्यपाल हे घटनात्मक महत्त्वाचे पद आहे. त्यामुळं बोलताना प्रत्येक राज्यपालांना काळजी घ्यावी लागेल. राज्यपालांकडून कोणतीही वादग्रस्त वक्तव्य होणार नाहीत. कोश्यारी यांच्या कालावधीत अनेक वादग्रस्त वक्तव्य झाल्याचे काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण म्हणाले.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी भारतीय जनता पक्षाचे राजभवनातले एजंट म्हणून काम केल्याची टीका शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली. राज्यपालांनी महाविकास आघाडी सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.
महाराष्ट्राची सुटका झाली. एक चांगला निर्णय घेतला आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली