PHOTO : बेळगावात शिवजयंती चित्ररथ मिरवणूक तब्बल साडेबारा तास चालली

बेळगावात चाललेली शिवजयंती चित्ररथ मिरवणूक तब्बल साडे बारा तास चालली. शनिवारी सायंकाळी सहा वाजता सुरु झालेली चित्ररथ मिरवणूक रविवारी सकाळी साडे सहा वाजता संपली.

Belgaon Shivjayanti Miravnuk

1/9
बेळगावात चाललेली शिवजयंती चित्ररथ मिरवणूक तब्बल साडे बारा तास चालली.
2/9
शनिवारी सायंकाळी सहा वाजता सुरु झालेली चित्ररथ मिरवणूक रविवारी सकाळी साडे सहा वाजता संपली.
3/9
सायंकाळी सहा वाजता पालखी पूजन करुन शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीचा शुभारंभ झाला.
4/9
मिरवणूक पाहण्यासाठी संपूर्ण रात्र लोकांनी गर्दी केली होती.
5/9
पालखीसमोर सनई चौघड्यांसह 35 जणांचा वडगावचा वारकरी भजनी मेळा होता.
6/9
यासोबतच पालखीच्या अग्रभागी तब्बल 80 सदस्यांचे मोरया झांज पथक आणि त्यामेग 40 लहान मुला-मुलींचा मंथन लाठीमेळा होता.
7/9
मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके, झांज पथक, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील महत्वाच्या प्रसंगावर आधारित जिवंत देखावे मिरवणुकीचे आकर्षण ठरले.
8/9
लोकांना बसून मिरवणूक पाहता यावी म्हणून महानगरपालिकेने धर्मवीर संभाजी चौक येथे गॅलरी उभारली होती.
9/9
पोलिसांनी डॉल्बीवर बंदी घातल्याने मिरवणुकीतील दणदणाट कमी झाला आणि ध्वनी प्रदूषण टळले.
Sponsored Links by Taboola