Yallamma Devi Yatra : उदं गं आई, उदं... भक्तांचा जयघोष, भंडाऱ्याची उधळण; सौंदत्तीत यल्लामा देवीच्या यात्रेचा थाट
Yallamma Devi Yatra : शाकंभरी पौर्णिमा निमित्त सौंदत्ती (Savadatti) येथील यल्लामा देवीची (Yallamma Devi) यात्रा लाखो भाविकांच्या उपस्थितीत पार पडली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकर्नाटक, महाराष्ट्र, गोवा आणि आंध्र प्रदेशातून लाखो भाविक यात्रेसाठी यल्लमा डोंगरावर दाखल झाले होते.
पहाटे मान्यवरांच्या उपस्थितीत देवीची पूजा आणि अभिषेक करून मंदिराचे दरवाजे भक्तांना दर्शनासाठी खुले करण्यात आले.
'उदं गं आई, उदं'चा गजर करत भक्त बैलगाडीतून डोंगरावर दाखल झाले.
संपूर्ण मंदिर परिसर भंडाऱ्यानं न्हाऊन निघाला होता.
गेली दोन वर्ष कोरोनामुळे यात्रा झाली नव्हती. त्यामुळे यावर्षी भक्तांनी मोठ्या संख्येनं यात्रेला उपस्थिती दर्शवली होती.
जोगन भावी येथे पवित्र स्नान करण्यासाठी देखील भक्तांनी मोठी गर्दी केली होती.
मंदिर परिसरात पूजा साहित्याची दुकानं थाटण्यात आली होती.
अनेक भक्तांनी तिथेच स्वयंपाक करून देवीला नैवेद्य दाखवला.
यात्रेमुळे हजारो वाहनं बेळगावात आल्यानं अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी वारंवार होत होती.
कर्नाटक परिवहन खात्यानं यात्रेच्या निमित्त विशेष बस सेवा उपलब्ध करून दिली होती.