PHOTO: कांदा चिरताना आईच्या डोळ्यात पाणी आले म्हणून मुलाने बनवला स्मार्ट चाकू
कांदा चिरताना आईच्या डोळ्यातून पाणी आले म्हणून सातवीच्या मुलाने चक्क स्मार्ट चाकू बनवला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबीड जिल्ह्यातल्या कुर्ला गावातील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या ओमकार शिंदेने ही कमाल केली आहे. त्यासाठी भाऊसाहेब राणे या शिक्षकांची त्याला मदत झाली आहे.
आई घरात कांदा चिरत असताना तिच्या डोळ्यात पाणी येत होतं. ते पाहून ओंकारला प्रश्न पडला की आईच्या डोळ्यात कांदा चिरताना पाणी येऊ नये म्हणून आपण काय करू शकतो.
त्यासाठी त्याने एक शक्कल लढवली चाकूच्या मुठीवर एक मोटार लावून तिला पाते बसवले आणि एक स्मार्ट चाकू बनवला.
या चाकूने कांदा कापताना ओमकारच्या आईच्या डोळ्यातून पाणी येत नसल्याचं त्या सांगतायत. निरक्षर असलेल्या आई-वडिलांना मुलाने केलेल्या संशोधनाच कौतुक वाटतंय.
ओमकारच्या या प्रयोगाची केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने दखल घेतली असून दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय इंस्पायर अवार्ड प्रदर्शनासाठी त्याची निवड झाली आहे.