Balasaheb Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांना कलाकारांचं अनोखं अभिवादन, स्टोन आर्टसह आपट्याच्या पानावर चित्र साकारलं
Balasaheb Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांना कलाकारांची अनोखं अभिवादन केलं आहे. कुणी स्टोन आर्ट काढलं तर कुणी आपट्याच्या पानावर चित्र साकारलं आहे
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 95व्या जयंती निमित्त चित्रकार सुमन दाभोलकर यांनी बाळासाहेबांचे स्टोन आर्ट साकारलं आहे.
बाळासाहेबांच्या 95व्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहणारं त्यांनी हे स्टोन आर्ट साकारलं आहे.
कणकवली मधील गडनदी मध्ये मिळणाऱ्या नैसर्गिक दगडाला कोणत्याही प्रकारचा आकार न देता दगडातून बोलकी कलाकृती सुमन नेहमी साकारत असतात.
दगडात प्राण फुंकून दगडाला जिवंत करणाऱ्या या अवलिया कलाकाराने बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त त्यांचं स्टोन आर्ट साकारलं आहे.
दगडाला आकार न देता, काटछाट न करता दगडावर चित्र साकारण्यात तसेच आव्हानात्मक चित्र साकारण्यात सुमन दाभोलकर यांचा हातखंडा आहे.
दुसरीकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड मधील गव्हाणे गावचे युवा चित्रकार अक्षय मेस्त्री यांनी आपट्याच्या पानावर 2 इंचाचं हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे याचं चित्र काढलं आहे.
दसऱ्याला सोनं लुटताना आपट्याच्या पानांचा उपयोग केला जातो. त्या आपट्याच्या पानावर अर्ध्या तासात अक्षय मेस्त्री याने हे चित्र साकारलं आहे.