Balumama Admapur : ढोल, कैताळचा गजर अन् भंडाऱ्याच्या उधळणीत आदमापुरात बकरी बुजवण्याचा कार्यक्रम रंगला

Balumama : दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर कोल्हापूर जिल्ह्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बाळूमामांच्या आदमापुरात बकरी बुजवणे कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये दूध ऊतू जाणे महत्वाचा भाग असतो.

Balumama Admapur

1/10
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र आदमापुरात बाळूमामा देवस्थानचा बकरी बुजवणे हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला
2/10
ढोल, कैताळचा गजर अन् भंडाऱ्याच्या उधळणीत हा कार्यक्रम मरगुबाई मंदिराजवळ पार पडला
3/10
दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर हा धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
4/10
बाळूमामांनी सुरू केलेली ही परंपरा आजतागायत भक्तांनी सुरु ठेवली आहे.
5/10
यावेळी फुलांनी सजवलेली बकरी याठिकाणी आणण्यात आली होती.
6/10
तसेच बाळूमामांच्या बकऱ्यांच्या लेंड्या एकत्रित करून त्याची रास केल्यानंतर पूजा केली जाते.
7/10
लेंड्यांच्या राशीसमोर गायीच्या शेणापासून वाडा तयार केला जातो.
8/10
बकरी सुजवणे, बकरी बुजवणे या कार्यक्रमात दूध ऊतू जाण्याचा कार्यक्रम महत्वाचा मानला जातो.
9/10
ऊतू गेलेलं दूध ज्या दिशेला जाईल ती दिशा सुजलाम होते अशी बाळूमामांची आख्यायिका आहे.
10/10
पश्चिमेला दूध ऊतू गेल्याने कोकणात चांगला पाऊस तसेच पीके चांगली येतील, असा संकेत मिळाला.
Sponsored Links by Taboola