Balumama Admapur : ढोल, कैताळचा गजर अन् भंडाऱ्याच्या उधळणीत आदमापुरात बकरी बुजवण्याचा कार्यक्रम रंगला
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र आदमापुरात बाळूमामा देवस्थानचा बकरी बुजवणे हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appढोल, कैताळचा गजर अन् भंडाऱ्याच्या उधळणीत हा कार्यक्रम मरगुबाई मंदिराजवळ पार पडला
दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर हा धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
बाळूमामांनी सुरू केलेली ही परंपरा आजतागायत भक्तांनी सुरु ठेवली आहे.
यावेळी फुलांनी सजवलेली बकरी याठिकाणी आणण्यात आली होती.
तसेच बाळूमामांच्या बकऱ्यांच्या लेंड्या एकत्रित करून त्याची रास केल्यानंतर पूजा केली जाते.
लेंड्यांच्या राशीसमोर गायीच्या शेणापासून वाडा तयार केला जातो.
बकरी सुजवणे, बकरी बुजवणे या कार्यक्रमात दूध ऊतू जाण्याचा कार्यक्रम महत्वाचा मानला जातो.
ऊतू गेलेलं दूध ज्या दिशेला जाईल ती दिशा सुजलाम होते अशी बाळूमामांची आख्यायिका आहे.
पश्चिमेला दूध ऊतू गेल्याने कोकणात चांगला पाऊस तसेच पीके चांगली येतील, असा संकेत मिळाला.