Balaji Tambe | 'मेकॅनिकल इंजिनीअर ते आयुर्वेदाचार्य... डॉ. बालाजी तांबे कालवश
आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांचं निधन झालं आहे. वयाच्या 81 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. (photo courtesy : @shreegurubalaji facebook)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबालाजी तांबे यांनी आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसारासाठी मोठं कार्य केलं. बालाजी तांबे यांनी आयुर्वेदिक औषधी शास्त्र आणि आयुर्वेदिक फिजिओथेरपी यावर संशोधन केले आहे.(photo courtesy : @shreegurubalaji facebook)
लोणावळ्याजवळील कार्ला येथील ‘आत्मसंतूलन व्हिलेज’ या प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांनी आयुर्वेदाच्या माध्यमातून लोकांची सेवा केली. (photo courtesy : @shreegurubalaji facebook)
अनेक आजारांवर आयुर्वेदाच्या माध्यमातून त्यांनी उपचार केले. विविध आयुर्वेदिक औषधांची संशोधन करुन त्यांनी निर्मितीही केली. त्यांच्या देशभरातूनच नव्हे तर परदेशातूनही रुग्ण उपचारासाठी येत असत. (photo courtesy : @shreegurubalaji facebook)
बालाजी तांबे यांनी मेकॅनिकल इंजिनीअरचीही डिग्री घेतली होती. (photo courtesy : @shreegurubalaji facebook)
अध्यात्माची आणि आरोग्याची सांगड घालण्यामुळे अनेकांनी त्यांना आपल्या जीवनात गुरूचे स्थान दिले.(photo courtesy : @shreegurubalaji facebook)
आयुर्वेदाबाबतचा डोळस दृष्टीकोन निर्माण करण्यात आणि नव्या पिढीत त्याबाबतची गोडी निर्माण करण्यात डॉ. तांबे यांचे मोलाचे योगदान आहे(photo courtesy : @shreegurubalaji facebook)