In Pics : ट्विटर, इंस्टाग्रामवरुन 'अक्षरकलावारी'ची अनोखी वारी; अक्षरकलेच्या सुलेखनातून विठुरायाचं दर्शन
डिजिटल माध्यमातून आपल्या सर्वांना अक्षरकलेच्या म्हणजेच सुलेखनातून देवाचे दर्शन शितलतारा घडवड आहे. तिचा अक्षरकलावारी हा उपक्रम ट्विटर, इंस्टाग्रामवर खूप लोकप्रिय आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवारी हा उत्सव फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून जागतिक पातळीवर साजरा व्हावा, प्रत्यक्ष सहभागी होता येत नसेल तरीही मिळेल त्या मार्गाने आपण त्यात सहभागी व्हावं म्हणून अक्षरकलावारी उपक्रम आहे.
संतांचे अभंग गोष्टी या सर्व आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत पण विठ्ठलाचे चित्र, त्याचं रूप, त्याची ऑरा कधी दृष्य स्वरूपात मांडली गेलेली नाही.
काळ्यासावळ्या विठ्ठलाला एक ऑरा आहे. दरवर्षी नवीन नवीन संत आणि त्यांचे युनिक अभंग यांचा समावेश कलाकृती मध्ये करायचा प्रयत्न अक्षरकलावारीचा असतो.
या वर्षी एका वेगळ्या अभंगाचे सुलेखन आणि एक वेगळं अमूर्त चित्र असं कलाकृतीचे स्वरुप आहे.
खरं तर कितीही वेळा विठ्ठलाचे रूप समोर आले तरीही समाधान होत नाही. म्हणून वेगवेगळ्या रुपात विठ्ठल स्वरूपाची कल्पना करणे एक नितांत सुंदर अनुभव असतो.
पंढरपूरात दरवर्षी वारी असते. लाखो लोक विठ्ठलाच्या ओढीनं वारीच्या तयारीला लागतात. खेड्यापाड्यांतून, गाव-शहरांमधून दिंड्या, पालख्या पांडुरंगाच्या ओढीनं निघतात. वारकरी टाळ-मृदंगांच्या गजरात, खांद्यावर पताका घेऊन, हरिनाम उच्चारत पंढरीला जातात.
हाती असलेली कला हे पंढरीच्या त्या वातावरणाशी जोडले जाण्याचे माध्यम असावे त्यासाठी हा प्रयत्न करण्यात आला आहे.
मुळात कुठलंही रूप रेखांकित करताना गाभा हा सर्वव्यापी असावा लागतो, एक ऑरा असावी लागते, कमी आकारांमधून मूळ रूपाचा अर्थबोध व्हायला हवा असतो.
हे सर्व विठ्ठलाच्या ठिकाणी उदंड आहे आणि अजून हवं तेवढ्या कलाकृती या विषयावर बनलेल्या नाहीत.
गणपती किंवा कृष्ण यांचा जसे रेखाटन होतं जसं कलाकृतींमध्ये हे जगभर प्रसिद्ध आहेत, तसा विठ्ठल प्रसिद्ध नाहीये.
रेखांकन करण्यासाठी म्हणजेच इलेस्ट्रेशन करण्यासाठी, मूळ रुपाला एक गाभा असावा लागतो, खूप कमी आकार किंवा कृतींमधून मूळ रूपाचा अर्थबोध व्हावा लागतो.
हे सर्व विठ्ठलाचे ठाई आहे. पण तरीही विठ्ठलाचे इलेस्ट्रेशन खूप कमी आहेत. वारीच्या निमित्ताने विठ्ठल जेवढा पाहिला जातो, तेवढा रेखाटला जात नाही. डिझाइन्स मध्ये येत नाही.
शितलताराच्या ट्विटर हॅन्डल @sheetaltara आणि इंस्टाग्राम हॅन्डल @sheetaltara21 वर आपल्याला रोज एक कलाकृती पाहायला मिळेल. #अक्षरकलावारी