Shirdi: शिर्डीत एकादशीनिमित्त 12 टन खिचडीचा महाप्रसाद, भाविकांची मोठी गर्दी
आज आषाढी एकादशी निमित्त शिर्डीत साईदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी साई प्रसादालयात खास साबुदाणाच्या महाखिचडीचा प्रसाद देण्यात आला आहे
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतब्बल 11 ते 12 टन साहित्याचा वापर यासाठी करण्यात आला आहे.
सबका मालिक एक संदेश देणा-या साईबाबांच्या दर्शनासाठी आज एकादशीच्या दिवशी भाविकांनी गर्दी केली आहे
आषाढी एकादशी हा उपवासाचा दिवस लक्षात घेऊन भाविकांसाठी आज खास साबुदाणा खिचडीचा महाप्रसाद देण्यात आला आहे
सकाळी नाश्ता तसेच भोजनातही उपवासाची खिचडी देण्यात आली.
साबुदाणा खिचडी ,शेंगदाण्याची आमटी आज प्रसादलाय बनवली जात असून हजारो भाविक या महाप्रसादाचा लाभ घेतील असा अंदाज घेत साईसंस्थानने तयारी केली आहे.
खिचडीचा प्रसाद बनवण्यासाठी 12 टन उपवासाच्या साहित्याचा वापर करण्यात आलाय.
साबुदाणा 6 हजार किलो , शेंगदाणे 5 हजार किलो, बटाटा 2 हजार किलो यासह साखर मिरचीता वापर महाखिचडी बनवण्यासाठी वापरण्यात आले आहे
शिर्डी पंचक्रोशीतील स्थानिक भाविक आवर्जून या प्रसादरुपी खिचडीचा आस्वाद घेण्यासाठी येत असतात
देशभरातून आलेल्या भाविकांनाही आज प्रसाद भोजनात भाजी, पोळी , वरण - भाताऐवजी साबुदाणा खिचडी मिळत असल्याने भाविकांनीही समाधान व्यक्त केलय