Mango: कोकणातील हापूस आंब्याने घेतला निरोप! आता जुन्नर हापूस आंब्याची आवक सुरू
विनायक पाटील, एबीपी माझा
Updated at:
12 Jun 2023 04:43 PM (IST)
1
कोकणातील हापूस आंब्याचा सिझन संपला असला तरी आंबा खवय्यांना जुन्नरच्या हापूस आंब्याची चव चाकता येणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
आजपासून जुन्नरचा हापूस नवी मुंबईच्या एपीएमसीमध्ये दाखल होवू लागला आहे.
3
जुन्नरच्या हापूस आंब्याला 500 रूपये डझन दर मिळत आहे.
4
दिवसाला 7 ते 8 हजार पेट्या एपीएमसीत दाखल होत आहेत.
5
पुढील काही दिवसात हीच आवक 15 हजार पेट्यांवर जाणार असून साधारण जुलै 15 तारखेपर्यंत जुन्नरचा हापूस खायला उपलब्ध राहणार आहे.
6
या वर्षी कोकणातील हापूस आंब्याला वातावरणाचा फटका बसल्याने दरवर्षी पेक्षा या वर्षी 50 टक्के आवक घटली होती.
7
कोकणातील हापूस आंबा कमी प्रमाणात मार्केटला आल्याने दरही तेजीत होते.
8
मात्र आता जुन्नर हापूस सुरू झाल्याने लोकांना परत एकदा हापूस आंब्याची चव चाखता येणार आहे.