In Pics : तळकोकणातील कणकवलीच्या कुंभवडे गावातील सह्याद्रीच्या रांगेचं विलोभनीय दृश्य, पाहा फोटो
कोकण बारमाही हिरवंगार असतं मात्र पावसाळ्यात कोकण अधिकच खुलून दिसत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहे खुललेल निसर्गाचं अनोखं रूप वर्षा ऋतूत पहायला मिळत. वर्षा ऋतूत निसर्ग बहरतो, खुलतो, फुलतो. याच काळात निसर्गाचं मनमोहन आणि देखणं असं रूप प्रत्येकाला भुरळ घालत.
प्रामुख्याने कोकणात सह्यादीच्या कुशीत कडेकपारीतून मनस्पोत, मनमुराद पने अनेक छोटे मोठे धबधबे प्रवाहित होतात.
अशीच विहंगम दृश्य सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील कुंभवडे गावातील दृश्य एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी घेऊन आलोत.
सध्या कोव्हिडंमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वर्षा पर्यटन बंद आहे. त्यामुळे माझ्याच्या प्रेक्षकांना खास ड्रोनने टिपलेली विहंगम दृष्य घेऊन आलो आहोत.
निसर्गाच हे अनोखं रूप पाहून डोळ्याचं पारणं फेडणार आहे.
कोकणातील पावसाळा म्हणजे आपल्याला बेधुंद करणारा अनुभव.
सह्याद्रीच्या कडेकपारीतुन फेसाळत मुक्तपणे कोसळणारे पांढरेशुभ्र धबधबे, हिरवागार निसर्गाने पांघरलेला शालू, ऊन पावसाचा खेळ आणि धूक हे सारं सध्या कोकणात अनुभवायला मिळत आहे.