15 दिवसांत आचारसंहिता, त्यानंतर निवडणूक; सोलापुरातून अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणा पुढील महिन्यातील पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू असून बड्या नेत्यांनी दौऱ्यालाही सुरुवात केली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे विविध दौऱ्यांच्या माध्यमातून जनतेत जाऊन संवाद साधत आहेत. यावेळी, लाडकी बहीण योजनेचा दाखल देत महायुतीला साथ देण्याचंही आवाहन केलं जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रसचे राष्ट्रीय नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा आज सोलापूर जिल्ह्यात पोहोचली असून मोहोळमध्ये त्यांचा कार्यक्रम पार पडला.
मोहोळमध्ये आज अजित पवार यांच्या उपस्थितीत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम पार पडला असून आमदार यशवंत माने, माजी आमदार राजन पाटील यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम संपन्न झाला.
मोहोळमध्ये भाषण करताना अजित पवारांनी विधानसभा निवडणुकांसंदर्भात भाष्य केले. पुढील 15 दिवसांत लागंल आचारसंहिता, त्याच्यानंतर निवडणूक, अशी माहिती अजित पवारांनी सोलापूर कार्यक्रमात बोलताना केली.
सोलापूर जिल्ह्यातून जास्तीत जास्त महायुतीचे आमदार निवडून आले पाहिजेत, मी माढ्यातही तेच सांगणार आहे, असे म्हणत मोहोळकरांना राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार निवडून देण्याचं आवाहन अजित पवारांनी केलंय.
दरम्यान, अजित पवारांनी मोहोळमधील कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनाही चांगलंच झापलं. तसेच, राजन पाटील यांचं कौतुक करत निवडणुकीबाबत भाष्य केलं.