नरवीर तानाजी मालुसरे यांचा इतिहास सांगणारे साडेतीनशे वर्ष पुरातन वृक्ष कोसळले

नरवीर तानाजी मालुसरे यांच्या शिवकालीन इतिहासाची साक्ष असलेले पोलादपूर येथील सुमारे साडेतीनशे वर्ष पुरातन वृक्ष आज कोसळले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
पोलादपूर तालुक्यातील उमरठ येथील कर्मभूमितील नरवीर तानाजी मालुसरे यांच्या स्मारक परिसरात सुमारे साडेतीनशे वर्षे पुरातन आंब्याचे झाड होते.

या आंब्याच्या ढोलीमध्ये मावळे हे तलवारी आणि हत्यारे लपवित असल्याची आख्यायिका सांगितली जाते.
दरम्यान, आज दुपारच्या सुमारास शिवकालीन इतिहास सांगणारे हे झाड उन्मळून पडले आहे.
यामुळे, नरवीर तानाजी मालुसरे यांच्या स्मारकाच्या परिसरात असलेली तटबंदी देखील तुटली आहे.
दरम्यान, पोलादपूर येथील नरवीर रेस्क्यू टीम मार्फत हे झाड बाजूला करण्यात आले .
सध्या राज्याच्या विविध ठिकाणी जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे. अनेक ठिकाणी नद्यांची पाणी चांगलीच वाढली आहे
रायगड जिल्ह्यातील पोलादपूर , महाड, माणगाव, पनवेल , पेण , मुरुड तालुक्यातील रहिवाशांचे स्थलांतरण केले आहे.
रायगड जिल्ह्यातील 26 गावातील रहिवाशांचे स्थलांतरण केले आहे.