PHOTO : 48 लाख रुपये खर्च करुन बीडमध्ये गावात उभारली हनुमानाची भव्य मूर्ती
गोविंद शेळके, एबीपी माझा
Updated at:
17 May 2022 04:36 PM (IST)
1
बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील डोंगर पिंपळा या ठिकाणी हनुमानाची भव्य मूर्ती उभारण्यात आली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
साठ फुटांपेक्षा जास्त उंच आणि भव्य अशी हनुमानाची मूर्ती उभारण्यासाठी तब्बल 48 लाख रुपये खर्च करण्यात आले.
3
डोंगर पिंपळा गावातील बांधकाम व्यवसायिक गोपाळ पवार यांनी आपल्या वडिलांच्या इच्छेखातर ही मूर्ती उभारली आहे
4
रेल्वे क्षेत्रातील मान्यवर आणि गावकऱ्यांच्या उपस्थितीत या मूर्तीची विधीवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. परिसरातील नागरिक या ठिकाणी आता दर्शनासाठी गर्दी करत आहेत
5
ही मूर्ती उभी करण्याच्या कामासाठी तब्बल नऊ महिन्याचा कालावधी लागला.
6
फायबर ग्लास आणि काँक्रिटचा वापर करुन मूर्ती बनवण्यात आली आहे. त्यामुळे पुढच्या 35 वर्ष या मूर्तीची झीज होणार नसल्याचं गावकऱ्यांनी सांगितलं.