Kolhapur News : कोल्हापुरात पार पडला म्हशी आणि रेड्यांचा रिंगण सोहळा!

दिवाळी सणात म्हशींना सजवून त्यांची मिरवणूक काढणे आणि रोड शो करणे ही कोल्हापूरमधील आगळीवेगळी परंपरा आहे. लोकही आवर्जुन या रोड शोचा आनंद घेतात.

Kolhapur News

1/10
कोल्हापूर शहरातील रेड्याची टक्कर, सागरमाळ येथे म्हशी आणि रेड्यांचा रिंगण सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला आमदार सतेज पाटील आणि ऋतुराज पाटील उपस्थित होते.
2/10
कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यामधील विविध गावांमध्ये दिवाळी सणात म्हशी पळवणे, रोड शो आयोजित केले जातात.
3/10
या कार्यक्रमांमधून म्हस आणि मालकांमधील प्रेम दिसून येत असते.
4/10
मालकांच्या इशाऱ्यावर म्हशींच्या कसरती या चांगल्याच डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या असतात.
5/10
कोल्हापूर जिल्ह्यात दिवाळीच्या आनंदासह म्हशींचा रोड शो सुद्धा आनंद घेत असतात.
6/10
अनेक गवळी या कार्यक्रमांसाठी नटवून आणतात.
7/10
कोल्हापूरमधील अनेक म्हशींना विविध नावांनी ओळखले जाते.
8/10
गौरी, पतंग, बुलेट, बावरी अशी अनेक हटके नावे म्हशींना कोल्हापूर शहरात दिली गेली आहेत.
9/10
गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापूर शहरात म्हशींना सजवण्यापासून ते त्यांच्या अंगावर दागिनेही घातले जातात.
10/10
मालकांचा तालावर उड्या घेणाऱ्या म्हशींचा रुबाब काही औरच असतो.
Sponsored Links by Taboola